श्री आई प्रतिष्ठान
PHOTOS
01
Awards
Our awards reflect the recognition of our commitment, dedication, and continuous efforts toward meaningful social impact.
02
Medical Camp
मे २०१२ रोजी सानपाडा येथील रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांचे आजार, वृद्ध व्यक्तींसाठी अस्थिचिकित्सा शिबिर व मार्गदर्शन करण्यात आले.
03
Women Empowerment
- ८ मार्च २०१३ रोजी श्री आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, महिला संरक्षण व स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर जागृती करणारा पहिला कार्यक्रम “जागर आईची” या नावाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रश्न-उत्तरांचा खेळ आणि त्यातून महिला सक्षमीकरण, महिला संरक्षण आणि स्त्रीभ्रूण हत्या यांचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात महिला पोलिस, दक्षता समिती आणि विविध क्षेत्रातील महिला नेतृत्त्वांनी सहभाग घेतला व मार्गदर्शन केले.
- ८ मार्च २०१४ रोजी नवी मुंबई वाशी रेल्वे स्टेशनसाठी श्री आई प्रतिष्ठानने महिलांसाठी तयार केलेला “जागर आईचा” हा उपक्रम रेल्वे पोलिस दलातील महिला, होमगार्ड महिला, साफसफाई कामगार महिला, संरक्षण दलातील महिला यांच्यासाठी राबविण्यात आला.
‘रेझिंग डे’ २०१९. ४ जानेवारी २०१९ पहिल्या सप्ताहात रेल्वे पोलिस ठाणे वाशी येथे सुरक्षा अभियान राबविण्यात आले.





















